TODAY TIPS

banner image
banner image

How to Choose a Stock Broker in India - ट्रेडिंग कसे करावे.. भाग २

How to Choose a Stock Broker in India - मागील लेखात अकाउंट उघडण्याबाबत विषद करताना काही बाबींचा विचार करावा यासंबंधी थोड विस्तृतपणे सांगतो. ते म्हणजे असे की....

How to Choose a Stock Broker in India

Things to know while opening a Demat Account 


काय होत आपण सरळ ब्रोकरकडे आपल अकाउंट उघडल तर प्रथम कंपनी अशी निवडावी की जीच मार्केटमध्ये चांगल नाव आहे. 

उदाहरणार्थ :


  • ज्यांच्याकडे सर्व सुविधा आपल्याला मिळतील. 
  • मग यात BANKING च्या सुविधा कशा आहेत 
  • तसेच कंपनीच प्रोफाइल 
  • IT मध्ये किती पुढारलेले आहेत 
  • तसेच ट्रेडिंग करण्यासाठी कुठल् सोफ्टवेअर वापरतात. 
  • अकाउंट उघडल्यावर ते खरच आपल्याला हवी असलेली पुरेशी मदत देतील की नाही व सहकार्य करतील की नाही याची माहिती काढण् बर असत. 


कारण नंतर बऱ्याचदा हात वर केले जातात आणि आपण पैसा मिळत असताना पण निराश होतो. काही वेळा ट्रेड केल्यानंतर बरेच पैसे कापले जातात ते कंपनी कायद्यानुसार बरोबर असते पण आपल्याला काहीच कळत नाही की पैसे गेले कुठे?

याला पर्याय म्हणजे सबब्रोकर निवडावा. एक असा विश्वासातला माणूस जो आपल्याला या सर्व गोष्टींची नीट माहिती देऊ शकेल. जो ब्रोकर व आपल्यातला दुवा बनतो. सब ब्रोकर निवडण्याचा एक फायदा सांगतो.

Who is Sub-broker ?

तुम्हाला ट्रेडिंगसंबंधी कुठल्याही कामाची गरज लागली तर आपण काय करणार कंपनीत फोन करणार. जर डायरेक्ट नंबर नसला तर तो जाणार RECEPTION वर मग तो फोन तिथून तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीकडे फिरवला जाईल. बरेचदा तो फिरतच राहतो. हे इतक त्रासदायक असत की तुम्ही कंटाळून जाता.

आता हेच जर काही महत्वाच काम असेल म्हणजे तुम्हाला एखादा सौदा फिरवायचा असेल ज्यात तुम्हाला मोठा तोटा होणार आहे आणि हे काम दोन तीन मिनिटातच झाल पाहिजे आणि यावेळी जर तुम्ही या फोन लाईनवर फिरत राहिलात तर विचार करा. हे एक छोट् उदाहरन झाल पण अश्या बऱ्याचश्या बाबी असतात ज्यात तुम्हाला तुमची काळजी घेणार कोणीतरी हव असत ते काम एक सबब्रोकर घेऊ शकतो.

सब ब्रोकर हे त्या कंपनीच्या हाताखाली काम करणारे त्या कंपनीचे छोटे AUTHORISED ब्रोकरच असतात.

हा एक पर्याय आहे बाकी आपण आपल्याला जे जास्त फायदेशीर असेल तो मार्ग निवडावा. कारण वर म्हटल्याप्रमाणे जस मूळ ब्रोकरचा आपण केलेल्या ट्रेडिंगमध्ये जसा हिस्सा असतो तसा तो सबब्रोकरचाही असतो म्हणजे आपल्या फायद्यात एक वाटा आणखी वाढतो. ( जर सब ब्रोकर पकडून पुढे जायचं असेल तर BROKERAGE चा हिस्सा पण तुम्ही अकाउंट उघडताना ठरवून घ्यावा)

(तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे जरूर कळवा)
How to Choose a Stock Broker in India - ट्रेडिंग कसे करावे.. भाग २ How to Choose a Stock Broker in India - ट्रेडिंग कसे करावे.. भाग २ Reviewed by Admin on November 04, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.