TODAY TIPS

banner image
banner image

Investment in Share Market - शेअर बाजारात पैसे कसे इन्व्हेस्ट करावे

Investment in Share Market  - बरेच लोक हा प्रश्न नेहमी विचारताना दिसतात कि शेअर बाजारात पैसे कसे आणि कुठे इन्व्हेस्ट करावेत?

तसा हा अभ्यासाचा विषय आहे पण बहुतेक वेळा आपल्याला या गोष्टींची माहिती नसल्यामुळे शेअर मार्केट मध्ये आपण पैसे कमावण्याच्या संधी गमावून बसतो. चला तर पाहू कि शेअर बाजारात पैसे कसे आणि कुठे इन्व्हेस्ट करावेत?


Investment in Share Market

हि काळ्या दगडावरची रेघ आहे कि आपण शेअर मार्केट मधील कुठल्याही कंपनीचा १००% अंदाज सांगू शकत नाही कि तीची किंमत वर जाईल कि खाली येईल. पण नीट अभ्यास आणि सराव आपल्याला नक्कीच थोडफ़ार फायदा करून देऊ शकतो.
त्याचबरोबर मार्केट मध्ये जर तुम्हाला काही कमवायचं असेल तर खालील मुद्दे लक्षात ठेवा.

DON'T INVEST COMPLETE AMOUNT


तुमच्याकडे असलेली संपूर्ण रक्कम एकाच शेअरमध्ये कधीही गुंतवू नका. म्हणजे तुमच्याकडे १०० रुपये असल्यास २५ रुपये एका शेअर मध्ये गुंतवा. तसेच आणखी काही शेअर्स शोधा कारण समजा की एखाद्या सौद्यात आपले नुकसान झाले असेल तर दुसर्‍या सौद्यात ते पूर्ण होऊ शकते. आणि शक्य असल्यास, थोड्या रकमेने प्रारंभ करा.

DON'T WAIT FOR RIGHT TIME


वर म्हटल्याप्रमाणे थोडा अभ्यास नक्की करावा आणि जर एखादा शेअर चांगला वाटत असल्यास तात्काळ विकत घ्यावा. बरेचदा आपण भाव खाली वर होण्याची वाट बघत असतो. काहीजण तर ज्योतिष किंवा अंकशास्त्र बघून निर्णय घेतात.

DON'T COPY - TAKE YOUR OWN DECISION


इतरांचे अनुसरण करू नका. एखाद्याचे निरीक्षण करणे किंवा सल्ला घेणे चांगले आहे, परंतु इतर लोक शेअर्स खरेदी करण्यासाठी उडी मारत आहेत म्हणून आपण त्यामागे धावणे आपल्यासाठी नुकसानीचे होऊ शकते. जे तुम्हाला सल्ला देतात किंवा जे तुमच्यासमोर मोठमोठ्या गोष्टी सांगतात त्यात बरेचदा त्यांना त्याबद्दल काहीही माहिती नसते.

STUDY WELL


गुंतवणूक करताना त्या भागाचे मूल्य पहा. काही चांगल्या कंपन्यांचे शेअर दर खूपच कमी असतात ( ५० ते ६० रुपये ) आणि कदाचित त्याच वर्षी तुम्हाला दीड वर्षात दुप्पट किंवा चौपट नफा मिळू शकेल. आता येथे तुमची गुंतवणूक क्षमता जितकी जास्त असेल तितका जास्त नफा होईल.

गुंतवणूक करताना लक्षात ठेवा की त्या कंपनीवर जास्त कर्ज नाही. आणि जर कर्ज असेल तर त्या कर्जव्याजाचा परतावा नीट करत आहेत कि नाही हे समजून घ्या. आणि अशा कंपन्या सर्वसाधारणपणे फायदेशीर असतात.

PREFER LONG TIME INVESTMENT


जर आपल्या अभ्यासावर आणि आपण गुंतवणूक केलेल्या कंपन्यांवर आपला विश्वास असेल तर - दीर्घकालीन गुंतवणूकीवर विश्वास ठेवा कारण यामुळे आपल्याला भविष्यात 100% नफा मिळतो.

DECIDE YOUR LOSS


शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट - आपल्याला एखाद्या कंपनीमधील गुंतवणूकीचा निर्णय चुकीचा असल्याचे आपल्याला आढळले तर आपल्या नुकसानाचे प्रमाण निश्चित करा.

उदाहरण - जर आपण 100 रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि शेअर्सची किंमत खाली येऊन ते 95 झाले तर घाबरू नका. आपण किती तोटा सहन करू शकता हे निश्चित करा.

बरेचदा काय होते की आपण तो माल 95 वर विकता आणि त्याच वेळी त्या स्टॉकचे 95 पासून उड्डाण सुरू होते. मग आपल्याला वाईट वाटत कारण तोच शेअर ९५ वरून १०० - १०५ - ११० - १५० वर जात आहे. आणि आपणास वाईट वाटते.

पण ज्या दिवशी आपण आपले नुकसान योग्यरित्या ठरविता, त्या दिवसापासून आपली वाढ देखील सुरू होईल.


फायदा कितीही होऊ दे पण नफा जास्त होऊ देणार नाही हे नक्की ठरवा. आपली बुद्धी वापरा.. 

(तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली हे प्रतिक्रिया करून नक्की कळवा)
Investment in Share Market - शेअर बाजारात पैसे कसे इन्व्हेस्ट करावे Investment in Share Market - शेअर बाजारात पैसे कसे इन्व्हेस्ट करावे Reviewed by Admin on February 27, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.