TODAY TIPS

banner image
banner image

Share Market Marathi - शेअर मार्केट "ए फेअरी टेल"

Share Market Marathi - शेअर मार्केट ही बहुधा आपणा सर्वांसाठीच एक फेअरी टेल आहे. म्हणजे लहानपणापासून आपण शेअर मार्केट बद्दल ऐकत आलो आहोत की लोक इथे सट्टा करून भरपूर पैसे कमावतात. पण हे कसे होते इथे प्रत्यक्षात काय घडते, हे बऱ्याचजणांना माहित नसते.

Marathi Share Market


मी माझे काही अनुभव इथे मांडत आहे. मी शेअर मार्केटच्या IT क्षेत्रात कार्यरत आहे. तसा प्रत्यक्षात माझा "ट्रेडिंग" या शब्दाशी काही देणघेण नव्हत. पण मार्केट मध्ये ट्रेडिंगशी निगडीत असलेले सगळे शब्द सारखे कानावर पडत असल्यामुळे आणि मी ज्या क्षेत्रात काम करतो (IT) हे एक प्रकारे या धंद्याचा कणा असल्यामुळे  सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती मला अनायासे मिळतच राहिली.

उन सब देखि और अनुभव की हुई अच्छी और बुरी बाते आपको बताने का प्रयास करूँगा।

शेअर मार्केट म्हणजे नेमके काय?




आपल्याकडे भारतात दोन प्रचलित एक्स्चेंज आहे जे बहुतेक सर्वाना माहीतच असावे.

NSE - NATIONAL STOCK EXCHANGE 
BSE - BOMBAY STOCK EXCHANGE


आता हा कारभार नेमका कसा चालतो. याबद्दल थोडी माहिती.

आपण वर्तमानपत्रात किंवा टीवीवरील बातम्या मध्ये नेहमीच असे वाचत असतो की आज  बाजार इतके point वर होता किंवा इतके point खाली होता. हे म्हणजे नक्की काय असत. तर यावरच "बाजाराची" म्हणजे शेअर मार्केटची उलाढाल चालू असते. काही हुशार व मुरलेले लोक बाजार वर किंवा खाली असल्यावर कसा आपला फायदा करतात हे मी इथे समजावण्याचा प्रयत्न करीन आणि आशा करतो की तुम्हाला हे नक्की आवडेल.

 (तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे जरूर कळवा)



Share Market Marathi - शेअर मार्केट "ए फेअरी टेल" Share Market Marathi - शेअर मार्केट "ए फेअरी टेल" Reviewed by Admin on November 04, 2013 Rating: 5

10 comments:

Powered by Blogger.